Tuesday, December 16, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील 'लिव्ह इन'मधील मैत्रिणीच्या खून प्रकरणाला नवं वळण; आरोपीचा आढळला मृतदेह

कोल्हापुरातील ‘लिव्ह इन’मधील मैत्रिणीच्या खून प्रकरणाला नवं वळण; आरोपीचा आढळला मृतदेह

लिव्ह इन रिलेशनशिप’मधून झालेल्या वादानंतर समीक्षा ऊर्फ सानिका नरसिंगे हिचा दोन दिवसांपूर्वी खून झाला होता. यानंतर आरोपी सतीश यादव खून करून पसार झाल्याने कोल्हापूर पोलिसांकडून ८ पथकांद्वारे त्याचा शोध सुरू होता.

 

सतीश यादव याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याच्या माळापुडे ते कातळेवाडी दरम्यान कासारी नदी काठावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

घटनास्थळी शाहूवाडी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. याबाबत अधिक तपास शाहूवाडी पोलिसांकडून केला जात आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सानिकाला चाकूने भोसकल्यानंतर त्याने पलायन केले होते.

 

सानिका नरसिंगे ही मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथे फ्लॅटवर राहण्यास होती. तिचा मित्र सतीश यादव हाही त्यांच्यासोबत राहण्यास गेला. तिघांनी ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ व्यवसाय सुरू केला होता. चार महिन्यांपासून सानिका व सतीश ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये एकत्रित राहण्यास होते, अशी माहिती तिच्या मैत्रिणीने दिली; पण महिन्याभरापासून दोघांतील वाद विकोपाला गेल्याने त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. सानिका १५ मे पासून कसबा बावडा येथे आईकडे राहण्यासही आली होती. मंगळवारी तिचे साहित्य फ्लॅटवरून आणण्यासाठी गेली असताना सतीश तिथे आला.

 

लग्न करण्यासाठी त्याने सानिकाला गळ घातली होती; पण तिने नकार दिल्याने दोघांत वाद होऊन यातच सतीशने चाकू तिच्या छातीत भोसकला. यातच सानिकाचा मृत्यू झाला. सतीश यादवच्या मागावर पाच पथके तैनात केली आहेत. पन्हाळा तालुक्यातील उंड्री या मूळगावी पथकाने छापा टाकला. तसेच शिवाजी पेठेत तो राहत असलेल्या ठिकाणीही पथकाने पाहणी केली. तसेच त्याचे मित्र, नातेवाइकांकडेही चौकशी सुरू आहे.

 

प्रत्यक्षदर्शींचे नोंदवले जबाब…

 

सानिकाचा खून झाला, त्यावेळी तिची मैत्रीण फ्लॅटमध्येच होती. तसेच घटनेनंतर हल्लेखोर सतीश फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळाल्याने सानिकाच्या एका मित्राने बाहेरून येऊन फ्लॅट उघडला होता. या दोघांचेही जबाब पोलिसांनी नोंदवले. सानिकाचे रक्ताने माखलेले कपडे, तसेच चाकूही पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -