Saturday, January 17, 2026
Homeमहाराष्ट्रपुढच्या 5 दिवसांत मोठा धोका, सर्वांनाच चिंतेत टाकणारा हवामान विभागाचा अंदाज!

पुढच्या 5 दिवसांत मोठा धोका, सर्वांनाच चिंतेत टाकणारा हवामान विभागाचा अंदाज!

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीनुसार पुढील 5 दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

आयएमडीच्या अंदाजानुसार उद्यापासून (12 जून) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

तर मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या भागात पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे काही ठिकामी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

 

येणाऱ्या 13 ते 16 जून या काळासाठीही हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. या काळात कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. ज्यामुळे नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ शकते, असं मुंबईच्या विभागीय हवामान विभागाने सांगितलं आहे.

 

तसेच, 13 ते 16 जून या काळात स्थानिक पूरामुळे पूल झाकले जाऊ शकतात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. डोंगराळ उतारांवरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, असंही मुंबईच्या विभागीय हवामान विभागाने सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -