Friday, November 14, 2025
Homeइचलकरंजीभांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकास मारहाण दोघा भावंडा विरूध्द गुन्हा दाखल

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकास मारहाण दोघा भावंडा विरूध्द गुन्हा दाखल

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गोविंद महेश मुडशी (वय ३३ रा. खोतवाडी) याच्या डोक्यात फरशी घातल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलिसात बाळकृष्ण गुंडला व विनायक गुंडला (आझादनगर तारदाळ) या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व गुंडला बंधु हे नातेवाईक असून त्यांच्यात जुना बाद आहे. मंगळवारी सायंकाळी योगाश्रम परिसरात बाळकृष्ण, विनायक आणि त्यांचा भाऊ अक्षय गुंडला यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण सुरु होते. गोविंद मुडशी हा त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेला असता बाळकृष्ण याने जुन्या वादातून मुडशी याच्या डोक्यात पाठीमागून फरशीने मारले. तर बाळकृष्ण व विनायक या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मुडशी याला जीवे मारण्याची धमकी दिली. डोक्याने फरशी लागल्याने मुडशी हा जखमी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -