Sunday, March 8, 2026
Homeकोल्हापूरकारमधून 9 किलो गांजा घेऊन जाणार्‍या महिलेसह सख्ख्या भावांना अटक

कारमधून 9 किलो गांजा घेऊन जाणार्‍या महिलेसह सख्ख्या भावांना अटक

कर्नाटकातून कारच्या डिक्कीतून तब्बल 9 किलो गांजा विक्रीसाठी कोल्हापुरात आणणार्‍या दोन सख्ख्या भावांसह एका महिलेला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरील राजाराम तलावाजवळ सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.

 

शमशतबरेज रियाज मुजावर (25) आणि जियाऊल्लरेहमान रियाज मुजावर (22, दोघेही रा. बाजार गल्ली, हुक्केरी, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्या भावांची नावे असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका महिलेचाही अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.

 

या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 30 हजार रुपये किमतीचा गांजा, मोबाईल आणि कार असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण आणि उपनिरीक्षक सचिन चंदन यांना कर्नाटकातून कोल्हापुरात एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. गुरुवारी मध्यरात्री संबंधित चारचाकी वाहन येताच पोलिसांनी ते अडवून त्याची कसून तपासणी केली. यावेळी कारच्या डिक्कीमध्ये गांजा असलेली पोती आढळून आली. पोलिसांनी मुजावर बंधूंकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गांजा विक्रीसाठीच आणल्याची कबुली दिली. या घटनेमुळे शहरात अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट पुन्हा एकदा उघडकीस आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -