Sunday, November 3, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दोन सख्ख्या भावांमध्ये जीवघेणी मारहाण; ३ गंभीर तर ८...

कोल्हापूर : दोन सख्ख्या भावांमध्ये जीवघेणी मारहाण; ३ गंभीर तर ८ जणांवर गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम


गारगोटी येथील पोफळे गल्लीतील वडील व दोन सख्खे भाऊ यांच्यात वडीलोपार्जीत जमीनीच्या वादावरून कोयत्याने जोरदार झालेल्या हाणामारीत पाच जण किरकोळ तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथील एका रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही भावांकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, याप्रकरणी वडील, भाऊ, सुन व नातू यांच्यासह आठ जणावर भुदरगड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गडहिंग्जल उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दिनेश रंगराव पाटील यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, वडीलोपार्जीत जमिनीच्या वाटणीवरून कौटुंबिक वाद सुरु आहे. या कारणावरून भाऊ सयाजी पाटील हा शिवीगाळ करीत होता. त्यामुळे मुलगा शुभम हा रेकॉर्डींग करीत असताना सयाजी याने मोबाइल काढून घेत, बंदुक रोखून तुला जीवंत सोडत नाही अशी धमकी दिली आणि बंदुक बाजूला केली. यावेळी वडील रंगराव पाटील यांच्या हातातील कोयता घेऊन सयाजी याने दिनेश यांच्या अंगावर कोयत्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीलाही धक्काबुकी केली. याप्रकरणी पोलीसांनी वडील रंगराव गोविंद पाटील व भाऊ सयाजी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणे तसेच आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सयाजीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दाढीवाला अनोळखी इसमाने कुर्‍हाडीने व पुतण्या शुभम याने कोयत्याने तुला ठार मारतो अशी धमकी देऊन हल्ला करून जखमी केले. तसेच भावजय स्वाती व भाऊ दिनेश याने मारहाणही केली. तर शुभम याने वडीलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याचे म्हंटले आहे. या प्रकारावेळी एका दाढीवाल्या इसमाने गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन काढून घेतली. आरडाओरड केली असता घरात घुसलेले चौघे व बाहेरील अनोळख्या दोघांनी पलायन केल्याचेही फियार्दीत नमूद आहे.

या घटनेत जखमी झालेल्या सयाजी व वडील रंगराव पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीसांनी पुतण्या शुभम दिनेश पाटील, भाऊ दिनेश, भावजय स्वाती, दाढीवाल्या इसमासह अनोळखी दोघावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमीत देशमुख करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -