Thursday, October 3, 2024
Homeनोकरीनोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारमध्ये 900 पदांसाठी मोठी भरती

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारमध्ये 900 पदांसाठी मोठी भरती

राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना खुशखबर दिली आहे. आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 900 पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एमपीएससीकडून अधिकृत संकेतस्थळावर ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021’ साठी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा सामावेश आहे.

पदे आणि पदसंख्या

उद्योग निरिक्षक (गट क) – 103 पदे
दुय्यम निरिक्षक (गट क)- 114 पदे
तांत्रिक सहाय्यक (गट क) – 14 पदे
कर सहाय्यक  (गट क) – 117 पदे
लिपिक-टंकलेखक (मराठी) – 473 पदे
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) – 79 पदे

या सर्व पदांसाठी 100 गुणांची एका तासाची बहुपर्यायी पूर्व परीक्षा होईल. तदनंतर मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. 

एमपीएससीच्या संकेतस्थळावर 22 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी2022 पर्यंत वरील पदांसाठी अर्ज करता येईल.

संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा ( गट क ) 2021 परीक्षा 3 एप्रिल 2022  रोजी होणार आहे. उमेदवारांनी अधिक तपशीला साठी
https://mpsconline.gov.in/candidate

संकेतस्थळावर भेट द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -