Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रविजेचा शॉक देऊन 11 वर्षाच्या मुलाचा खून

विजेचा शॉक देऊन 11 वर्षाच्या मुलाचा खून

मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या फैजान नाजीम (वय 11) या परप्रांतीय अल्पवयीन मुलाचा 14 वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन मुलाने विजेचा शॉक देऊन खून केला. सोमवारी पहाटे फैजानचा संशयास्पद मृत्यू झाला होता

 

पोलिस तपास व फॉरेन्सिक अहवालात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद विनोद सुरेश पिलाणे यांनी दिली आहे.

 

आळते येथील निजामियाँ मदरसामध्ये सुमारे 80 ते 90 मुले धार्मिक शिक्षण घेतात. तेथेच राहून फैजान नाजीम (मूळ बिहार) शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे तो उठला नसल्याने त्याला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याच्या हातापायावर भाजल्यासारख्या जखमा दिसल्याने त्याचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. तपासणी व शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी तेथे शिकत असलेल्या अन्य मुलांकडे कसून चौकशी केली. चौकशीत मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या बिहार येथीलच 14 वषीर्र्य अल्पवयीन मुलाने विद्युत प्रवाहित वायरीने शॉक देऊन त्याचा खून केल्याचे कबूल केले.

 

खून करून झोपी गेला

 

मदरसामधून बाहेर पडण्यासाठी फैजान नाजीम याला झोपेत असताना रविवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास विद्युत वायरीने शॉक दिला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खुनी मुलगा झोपी गेला. सोमवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -