Wednesday, June 25, 2025
Homeब्रेकिंगजूनच्या शेवटच्या आठवड्यात पूरस्थितीची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूरस्थितीची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्राने जूनच्या मध्यावरच संपूर्ण महिन्याची सरासरी गाठण्याचा विक्रम यंदा केला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या दोन्ही भागांत पूरस्थितीची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

 

कोकणात २३ जूनपर्यंत अतिवृष्टी सुरू राहणार आहे, तर मध्य महाराष्ट्र अन् विदर्भात मुसळधारेचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी मान्सूनने गुजरात, मध्य प्रदेश, बिहार ही राज्य काबीज केल्याने आता देशाच्या ६५ टक्के भागांत मान्सून पोहचला आहे.

 

यंदा राज्यात मान्सून २६ मे रोजी आला. मात्र, तो वीस दिवस मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत अडखळला होता. गेल्या २४ ते ४८ तासांपासून तो अचानक संक्रिय झाला. त्यामुळे त्याने यंदा १७ जून रोजीच उत्तर भारतात प्रवेश केला आहे. त्यामुळे दिल्ली, राजस्थान आणि पंजाब ते हिमालय पायथा तो यंदा विक्रमी वेळेत पार करेल, असे चित्र दिसत आहे.

 

महाराष्ट्रात मान्सून भरभरून बरसत आहे

 

यंदा कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातही कोकण आणि घाट माथ्यावर विक्रमी पाऊस गत १६ दिवसांत झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पूरस्थितीचा अंदाज तज्ज्ञांनी दिला आहे.

 

, अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणेराज्यात आगामी ४८ तास कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कारण, गुजरातमध्ये चक्रीय स्थिती तयार झाल्याने त्या भागात दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचा परिणाम कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र भागावर होणार आहे. त्यानंतर पाऊस कमी होत आहे. तो पुन्हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाढणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -