Homeइचलकरंजीकृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचीत घट

कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचीत घट

पावसाने उघडीप दिल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा नदीच्या पातळीत घट झाली आहे.पावसाने उघडीप दिल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा- पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत बुधवारी दिवसभरात अर्धा फुटाने घट झाली आहे. यामुळे कृष्णा-पंचगंगेच्या काठावरील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरु आहे.तसेच शिरोळ तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने पुर्ण उघडीप दिली आहे.यामुळे कृष्णा -पंचगंगेच्या

पाणी पातळीत संथ गतीने उतार २६.५ फुट झाली.यानुसार पाणी

सुरु आहे. धरणक्षेत्रात झालेल्या

अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगेच्या पाणी पातळीत मंगळवारी एका दिवसात तब्बल १२ ते १५ फुटाने वाढ झाली होती. दरम्यान पावसाने पुर्ण उघडीप दिल्याने कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळी दिवसभरात अर्धा घट झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता राजापुर बंधायावर पाणी पातळी २७ फुट होती. ती सांयकाळी पाच वाजता

फुटाने

पातळी संथ गतीने ओसरत आहे. पाणी ओसरत असल्याने कृष्णा नदीपलीकडील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या सात गावातील नदीकाठी शेती असणान्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान वारणा धरणातून मंगळवारी ७७० क्युसेकने प्रतिसेकंद विसर्ग सुरु होता. तो बुधवारी १२१९ क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे पाणी पातळी जैसे थे राहु शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -