Thursday, June 26, 2025
Homeइचलकरंजीश्रद्धा अकॅडमीची तोडफोड ; १५ जणांवर गुन्हा

श्रद्धा अकॅडमीची तोडफोड ; १५ जणांवर गुन्हा

पलूस येथील यश यादव या विद्यार्थ्यांन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संतप्त युवकांच्या जमावाने श्रद्धा अकॅडमीच्या मुख्य इमारतीवर जोरदार दगडफेक करत तोडफोड केली. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा अकॅडमीत इयत्ता १२ वीमध्ये शिकत असलेल्या यश अजित यादव (वय १७, रा. पलूस, जि. सांगली) या विद्यार्थ्याने तो राहण्यास असलेल्या सुतारमळा परिसरातील हॉस्टेलमधे मंगळवारी सकाळी बाथरूममध्ये टायने गळफास घेऊन आत्महत्या

केली. या घटनेचा निषेध नोंदवत सायंकाळी संतप्त युवकांनी जमावबंदी आदेश असताना रिक्रेशन हॉल परिसरातील श्रद्धा अकॅडमीच्या इमारतीवर जोरदार दगडफेक करत इमारतीच्या काचा फोडण्यासह फुल झाडांचे नुकसान तसेच अकॅडमीचे डिजीटल बोर्ड फाडुन अंदाजे ४० हजार रुपयाचे नुकसान केले. प्रकरणी पोलीस शिपाई अदित्य मारुती दुंडगे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामध्ये राहुल राजीव आवळे, इंद्रजित घोरपडे, संतोष आवळे, जमिल मोमीन, आर्यन लोखंडे, वैभव पवते, पवन तडाखे, सतिश आवळे, अजित भोरे, वसिम कलावंत, महेश केंगार, किशोर आवळे, दस्तगीर बागवान, अमर आळंदे, सचीन कुंभार, (सर्व रा. इचलकरंजी) यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -