Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रपंढरीत चंद्रभागा नदीत बुडून बेळगावच्या भाविकाचा मृत्यू

पंढरीत चंद्रभागा नदीत बुडून बेळगावच्या भाविकाचा मृत्यू

आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी यात्रेवर महापुराचे सावट आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाच शुक्रवारी (दि. 20) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरलेला बेळगाव येथील तरुण भाविक शुभम पावले (वय 27) याचा बुडून मृत्यू झाला.

 

शुभम मित्रांसोबते विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आला होता. सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पुंडलिक मंदिराजवळ नदीत तो अंघोळीला गेला. तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तब्बल चार तासांच्या शोध कार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला. अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत.

 

जीवरक्षक ठेवण्याची मागणी

 

शुक्रवारी (दि. 20) सकाळीच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक झाले अन् याच दिवशी एकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. आता आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीत भाविकांची गर्दी होत आहे. प्रशासनाने या ठिकाणी जीव रक्षक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. ऐन वारी काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दहा जीवरक्षक बोटी तैनात करण्यात येणार आहेत. मात्र, तोपर्यंत भाविक बुडून मृत्यू पावत असल्याने भाविकांमधून भीती व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -