Homeब्रेकिंगरेशनसाठी ई-केवायसी 30 जूनपर्यंतच मुदत

रेशनसाठी ई-केवायसी 30 जूनपर्यंतच मुदत

अक्कलकोट तालुक्यात प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजने अंतर्गत एकूण 1 लाख 58 हजार 501 लाभार्थी असून यापैकी 1 लाख 14 हजार 302 लाभार्थ्यांनी ई केवायसी केली आहे. अद्याप 44 हजार 199 रेशन कार्ड लाभार्थ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.

 

आजपर्यत 72 टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे, तर अद्याप 28 टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे. ई केवायसीची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. रेशन कार्डमध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी किंवा जे लाभार्थी रेशन दुकानात जाऊ शकत नाहीत, अशा लाभार्थ्यांना मोबाईलवर मेरा केवायसी अ‍ॅपद्वारे ई केवायसी करणे शक्य असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी विराज वासेकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -