चित्रपटसृष्टी सोडलेली अभिनेत्री सना खानवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या डोक्यावरील मायेची छत्रछाया हरपली आहे. तिची आई, सईदा यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सनाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.
सनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “इन्ना लिल्लाहि इन्ना इलैहि राजिऊन (एखाद्याच्या मृत्यूच्या बातमीवर म्हटली जाणारी दुआ). माझी प्रिय आई, मिसेस सईदा, अल्लाहकडे परत गेली. तिची प्रकृती बिघडली होती. आज रात्री (24 जून) ईशा नमाजानंतर रात्री 9:45 वाजता ओशिवारा स्मशानभूमीत नमाज पठण होईल.”
सनाने तिच्या सर्व चाहत्यांना दुआ करण्याची विनंती केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “तुमच्या दुआ माझ्या आईसाठी मदत करतील.” सना नुकतीच तिचे पती मुफ्ती अनस यांच्यासोबत हज यात्रेसाठी सौदी अरबला गेली होती आणि तिथून परतली आहे. हज यात्रेनंतर सना खूप आनंदी होती. तिने हजदरम्यानच्या काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती, ज्यात ती आणि अनस यांच्या चेहऱ्यावरील हजच्या आनंद स्पष्ट दिसत होता. पण आता सनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सना खान एकेकाळी बॉलिवूडमधील मोठे नाव होती. तिने सलमान खानच्या ‘जय हो’ आणि अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ यासारख्या मोठ्या चित्रपटांत काम केले होते. 2020 मध्ये तिने मनोरंजन विश्वाला अलविदा केला. आता सना ‘हया बाय सना खान’ या नावाने आपला व्यवसाय चालवते. या कंपनीअंतर्गत ती अबाया आणि हिजाबसारखी उत्पादने विकते. तसेच, ती ‘फेस स्पा बाय सना खान’ नावाने आणखी एक व्यवसाय चालवते.