शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात पेरणी केली आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पुढचा पाऊस नेमका कधी होणार? असे विचारले जात आहे. असे असतानाच आता हवामानाचा नवा अंदाज समोर आला आहे.
येत्या 24 तासांत कोकण व घाटांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, पुणे घाटात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उद्या म्हणजेच 25 जून रोजी कोकण व सर्व घाटांत ओरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अन्य ठिकाणी मेघगर्जनेस पाउस होण्याची शक्यता आहे.26 ते 28 जूनदरम्यान कोकण व घाटांत पावसाचाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.







