Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रसिरीलयमधील अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं

सिरीलयमधील अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं

मुंबईच्या पश्चिम उपनगरात वास्तव्याला असणाऱ्या एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक वास्तव्याला होती. ती टेलिव्हिजनवरील गुजराती मालिकांमध्ये (Television Actress) काम करत होती. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 

प्राथमिक माहितीनुसार, या अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितले. मात्र, त्याला क्लासला जायचे नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे मुलगा संतापला होता. याच संतापाच्या भरात मुलाने इमारतीच्या 57 व्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाकली. 57 व्या मजल्यावरुन थेट खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू (Suicide News) झाला. आत्महत्या करणारा मुलगा या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे कांदिवली (Kandivli News) परिरसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, या मुलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याला 57 व्या मजल्यावरुन उडी टाकताना कोणी बघितले की नाही, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी कोणती नवी माहिती समोर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -