Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप

कोल्हापूर तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नाती समान असलेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील ५१ वर्षीय नराधमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. व्ही. जोशी यांनी गुरुवारी (दि. २३) मरेपर्यंत जन्मठेप आणि वेगवेगळ्या कलमांन्वये दंडाची शिक्षा सुनावली. यशवंत बापू नलवडे (रा. सावे ता. शाहुवाडी) असे त्याचे नाव आहे.

पन्हाळा तालुक्यात बहुचर्चित ठरलेल्या बालिकेवरील अमानुष अत्याचार खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ॲड. मंजूषा पाटील यांनी काम पाहिले. या खटल्याच्या निकालाकडे शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -