Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाI P L लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी बंगळूर येथे आयोजन

I P L लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी बंगळूर येथे आयोजन

ताजी बातमी ऑनलाईन टीम


इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावाची (IPL Auction) तारीख जवळपास निश्चित झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होऊ शकतो. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी, सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली आहे. याशिवाय, लवकरच दोन नवीन आयपीएल संघ लखनऊ आणि अहमदाबाद देखील त्यांच्या पहिल्या 3 खेळाडूंच्या नावांची घोषणा करतील.

आयपीएल 2022 मध्ये, यावेळी 8 ऐवजी 10 संघ भाग घेतील. गोयंका ग्रुपची लखनऊ फ्रँचायझी यात सहभागी आहे. सीव्हीसी ग्रुपला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अहमदाबाद संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाले आहे. आयपीएल २०२२ भारतातच आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड मेगा लिलावापूर्वी देशातील कोरोना परिस्थिती आणि रुग्णांची संख्या देखील विचारात घेत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, सीव्हीसी ग्रुपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर बोर्ड आता कोणत्याही अडचणीशिवाय आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित करू शकतो. दोन नवीन आयपीएल संघांपैकी लखनऊने अलीकडेच अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. याशिवाय भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरची संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -