Friday, July 4, 2025
Homeक्रीडाभारत पाकिस्तान सामना 20 जुलैला, संघाची धुरा युवराज सिंगच्या खांद्यावर

भारत पाकिस्तान सामना 20 जुलैला, संघाची धुरा युवराज सिंगच्या खांद्यावर

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही इंडिया चॅम्पियन्स, पाकिस्तान चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्स यांचा समावेश आहे. या पर्वाला 18 जुलैपासून सुरु होणार आहे. भारताने पहिल्या पर्वात जबरदस्त कामगिरी करत जेतेपद मिळवलं होतं. दुसऱ्या पर्वातही भारतीय संघ जेतेपद कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. टीम इंडिया 20 जुलै रोजी पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध पहिला लीग सामना खेळेल. त्यानंतर 22 जुलै रोजी दुसरा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सविरुद्ध, 26 जुलै रोजी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्ध, 27 जुलै रोजी टीम इंडियाचा चौथा लीग सामना इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध होईल. तसेच शेवटचा लीग सामना 29 जुलै रोजी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सविरुद्ध होईल. या स्पर्धेतील दोन्ही सेमीफायनल 31 जुलै रोजी खेळल्या जातील आणि अंतिम सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.

 

स्पर्धेत भारताचा अष्टपैलू युवराज सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शिखर धवन, रॉबिन उथप्पा हे दोन खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत पदार्पण करतील. अंबाती रायुडू, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, पियुष चावला, स्टुअर्ट बिन्नी, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, सिद्धार्थ कौल, अभिमन्यू मिथुन, वरुण आरोन आणि पवन नेगी हे भारतीय खेळाडू संघात असतील.

 

मागच्या पर्वात भारताने खेळलेल्या पाच साखळी सामन्यांपैकी दोन सामने जिंकले होते. तसेच तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण गुणतालिकेत चौथं स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती. इंडिया चॅम्पियन्स संघाने पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्स संघाचा ८६ धावांनी पराभव केला आणि नंतर अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा पाच विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

भारत चॅम्पियन संघ : युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, पीयूष चावला, स्टुअर्ट बिन्नी, गुरकीरत मान, विनय कुमार, सिद्धार्थ कौल, वरुण आरोन, अब्दुल कुमार, अंबाती रायडू.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -