Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रशाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं?...

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथं शाळेच्या पहिल्याच दिवशी हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. वडील त्याला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. शाळेच्या गेटवर त्यांना उतरवलं असतानाच ही धक्कादायक घटना घडली.

 

अवघ्या १२ वर्षीय मुलाचा असा मृत्यू झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

 

बाराबंकी इथल्या देवामधील शाळेत अखिल प्रताप सिंह शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर त्याला शाळेत सोडण्यासाठी वडील गेले होते. अखिलच्या वडिलांनी सांगितलं की, तो पूर्णपणे तंदुरुस्त होता, त्याला कोणताच आजार नाही. मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही. डॉक्टरांनी अखिलचा मृत्यू सायलंट हार्ट अटॅकने झाल्याचं म्हटलंय. अखिल सेंट अँथनी स्कूलमध्ये सातवीत शिकत होता.

 

मंगळवारी सकाळी जितेंद्र प्रताप सिंह हे स्वत: अखिलला सोडण्यासाठी शाळेत गेले होते. अखिलला कोणतंही औषध सुरू नव्हतं. तो कारमधून उतरला. त्याच्या पाठीला स्कूल बॅग होती. बाजूला उभा राहिलेला अखिल कारच्या दिशेनं पावला टाकताच खाली कोसळला.

 

अखिल खाली कोसळताच त्याला जवळच्या रुग्णालायत दाखल केलं. त्याची गंभीर परिस्थिती पाहून लखनऊतील रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र अर्ध्या वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्यांच सांगताच अखिलच्या वडिलांनी आक्रोश केला.

 

अखिलवर मंगळवारी सायंकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. जितेंद्र प्रताप सिंह यांचा अखिल हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचाकन मृत्यूने दोघांनाही धक्का बसला आहे. अखिलची आई एका कॉलेजमध्ये शिक्षिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -