Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रमुलीच्या छेडछाडीस विरोध, कुटुंबीयांना मारहाण

मुलीच्या छेडछाडीस विरोध, कुटुंबीयांना मारहाण

शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीस विरोध केल्याने मुलीच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.४) सायंकाळी घडली. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या मारहाणीत मुलीचे वडील व आई जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी भागात राहणाऱ्या आरोपी सचिन पठाडे याने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने तिच्या वडिलांनी त्यास विरोध केला.

 

त्यानंतर सचिन पठाडे याच्यासह गणेश काकडे, राजू, दत्ता, सचिनचा मेहुणा, अनिल अंकुश पठाडे, सचिन चितळे, अंकुश पठाडे यांच्यासह महिलांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा मुलीच्या वडिलांकडून दिलेल्या तक्रारीनुसार नऊ आरोपींविरोधात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी याप्रकरणात सचिन पठाडे व गणेश काकडे या आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपी फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून आर- ोपीविरोधात मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, पोक्सो तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी हे करीत आहेत.

 

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन आर- ोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या मुलीचे वडील व आईची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -