Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रपरदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ सुंदर देशात व्हिसाशिवाय मिळणार एन्ट्री

परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ सुंदर देशात व्हिसाशिवाय मिळणार एन्ट्री

भारतातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. असा एक देश आहे जिथे भारतीय वंशाचे लोक सत्तेत आहेत आणि भारतीय पर्यटकांसाठी विशेष सुविधा देखील प्रदान करतात. त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात भारतीयांना 90 दिवस व्हिसाशिवाय राहता येते.

 

तुम्ही पर्यटनासाठी किंवा व्यवसायाशी संबंधित कामासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगोला जात असाल तर तुम्हाला या देशात व्हिसाशिवाय 90 दिवस राहू शकता. यासाठी काही नाममात्र अटी आहेत. मात्र अभ्यासासाठी किंवा इतर कामासाठी गेल्यास व्हिसा घेणे आवश्यक आहे.

 

भारतीयांना त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये रहायचे असल्यास काही अटी आहेत, तुमचा भारतीय पासपोर्ट किमान 6 महिने वैध असावा. हॉटेल बुकिंगची कारदपत्रे दाखवावी लागतील. जर नातेवाईकांकडे जात असाल तर त्याबाबत माहिती द्यावी लागेल

 

त्रिनिदाद आणि टोबॅगोला गेल्यावर तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीबाबत प्रश्न विचारला जाईल. म्हणजे तुम्ही येथे राहण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे तपासले जाईल. तसेच परतीच्या विमान तिकिटही मागितले जाऊ शकते.

 

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष भारतीय वंशाचे आहेत. येथे होळी, दिवाळी, ईद आणि ख्रिसमस सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तसेच येथे धबधबे आणि वन्यजीवही आहेत. त्रिनिदाद कार्निव्हलला “द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ” म्हटले जाते, हा शो पाहण्यासाठी जगभरातून लोक गर्दी करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -