Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रनशेत तरुणासोबत धक्कादायक कांड, मित्राने जेंडरच केलं चेंज, शहर हादरलं

नशेत तरुणासोबत धक्कादायक कांड, मित्राने जेंडरच केलं चेंज, शहर हादरलं

मध्य प्रदेशच्या नर्मदापूरममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराणं खळबळ उडाली आहे. एका तरुणाला दुसऱ्या तरुणावर प्रेम झालं. मात्र ज्याच्यावर प्रेम झालं त्या तरुणानं पीडित तरुणासोबत धक्कादायक कांड केलं आहे. या प्रकरणात आता पीडित तरुणाकडून आपल्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण?

 

हा पीडित तरुण औबेदुल्लागंज शहरातील रहिवासी आहे, त्याच्या बहिणीचं सासर नर्मदापूरम येथे आहे. तो सतत आपल्या बहिणीकडे नर्मदापूरम येथे येत जात होता. याच दरम्यान त्याची ओळख शुभम यादव नावाच्या तरुणासोबत झाली. शुभम हा ग्लालटोली येथील रहिवासी आहे. दोघांची हळूहळू ओळख वाढत गेली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

 

पीडित तरुणानं आपल्या तक्रारीमध्ये असं देखील म्हटलं आहे की, शुभमने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यानंतर त्याने हॉटेलमध्ये अनेकदा माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले, त्यानंतर त्याने मला विश्वास वाटावा यासाठी माझ्या बँक खात्यामध्ये सहा लाख रुपये देखील पाठवले, असा दावा या तरुणानं केला आहे. मात्र त्यानंतर या तरुणासोबत मोठं कांड घडलं आहे.

 

या तरुणानं असा आरोप केला आहे की, 18 नोव्हेंबर रोजी शुभमने मला खजराना परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेलं, तिथे माझं ऑपरेशन करण्यात आलं. शुभमने माझं जेंडर चेंज केलं. जेंडर चेंज केल्यानंतर शुभमने मला नर्मदापूरममध्ये बोलावलं, तिथे माझ्यावर अत्याचार केला. मी नशेमध्ये असताना माझं जेंडर चेंज केल्याचा दावा देखील या तरुणानं केला आहे. त्यानंतर मला शुभमने 18 दिवस एका खोलीमध्ये बंद करू ठेवलं, या दरम्यान तो काही तरी विचित्र तंत्र-मंत्र करत होता. त्याने मला मारण्याची देखील धमकी दिली. तो आता माझ्याकडे दहा लाख रुपये मागत असल्याचं देखील या तरुणानं म्हटलं आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -