शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चढ-उतार सुरु आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मात्र एक मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही दिवसांपासून दररोज अप्पर सर्किट सेट करत आहे, त्यामुळे या शेअरचे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. 25 महिन्यांपूर्वी हा स्टॉक 50 पैशांपेक्षा स्वस्त होता, मात्र आता तो 46 रुपयांवर पोहोचला आहे.
गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या या शेअरचे नाव ओमॅन्श एंटरप्रायझेस लिमिटेड आहे. आज हा शेअर 2 टक्क्यांनी वाढून 46.06 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने 52 आठवड्यांमधील सर्वोच्च पातळी गाठली आहे. गेल्या 5 दिवसांत या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका महिन्यात या शेअरने 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
2025 च्या सुरुवातीला या स्टॉकची किंमत 4.28 रुपये होती. आतापर्यंत हा स्टॉक 976 टक्क्यांनी वाढून 46 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीला या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्ही 10 लाख रुपयांचे मालक झाला असता.
एका वर्षात 4000% पेक्षा जास्त नफा
गेल्या एका वर्षात या स्टॉकने 4372 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षी तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत 44.72 लाख रुपये झाली असती. ज्या गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवलसे ते आज मालामाल झाले आहेत.
25 महिन्यांत करोडपती
12 जून 2023 रोजी या स्टॉकची किंमत 46 पैसे होती. आज हा शेअर 46.06 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या 25 महिन्यांत या स्टॉकने 9910 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तुम्ही जून 2023 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ती रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती. म्हणजेच तुम्ही अवघ्या 25 महिन्यांत करोडपती बनला असता.