वडोदरा आणि आणंदला जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सदर पूलावरुन जाणारे अनेक वाहने देखील नदीत कोसळले.या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
एक टँकर पूलावर अडकून राहिल्याचे देखील दिसत आहे.
सदर टँकर कधीही नदीत कोसळू शकतो अशा अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.