Thursday, August 7, 2025
Homeमहाराष्ट्रश्वानामुळे वाचला 67 लोकांचा जीव, नेमकं काय घडलं? वाचा…

श्वानामुळे वाचला 67 लोकांचा जीव, नेमकं काय घडलं? वाचा…

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाठी गावात भूस्खलन झाले होते. यामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. मात्र या घटनेत एका श्वानामुळे तब्बल 67 लोकांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेपूर्वी एका श्वानाने दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांचा जीव वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

30 जूनच्या रात्री सियाठी गावात मुसळधार पाऊस पडत होता. गावातील लोक आरामात झोपले होते. मात्र त्या रात्री एका घरातील दुसऱ्या मजल्यावर असलेला एक श्वान अचानक जोरजोरात भुंकू लागला, यामुळे कुंटूंबीयांना जाग आली. लोक सुरुवातीला घाबरले, मात्र त्यांना घराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले. यामुळे घरात पाणी भरायला सुरुवात झाली होती.

 

यानंतर कुंटूंबाने श्वानाला सोबत घेतले आणि घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाण गाठले. यावेळी लोकांनी शेजाऱ्यांनाही जागे केले आणी सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेले. काही वेळाने डोंगराचा एक मोठा भाग तुटून गावावर पडला. यात डझनभर घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली, मात्र या श्वानाच्या इशाऱ्यामुळे गावातील 67 लोकांचे प्राण वाचले. हे सर्व लोक सध्या मंदिरात आश्रय घेत आहेत.

 

प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीची माहिती समजते

 

याआधीही अनेकदा प्राण्याची नैसर्गित आपत्तीची सूचना दिल्याचे समोर आलेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते प्राण्यांना याबाबत माहिती मिळू शकते. श्वान, पक्षी, मासे आणि कीटक यांना असामान्य हालचाली आधीच जाणवतात. त्यामुळे साप आणि उंदीर अनेकदा भूकंप होण्यापूर्वी बिळातून बाहेर पडतात. पक्षीही घरटे सोडतात आणि श्वान भुंकू लागतात.

 

प्राण्यांना धोका कसा समजतो?

 

प्राण्यांना पृथ्वीच्या आतून येणारी कंपने, वातावरणाच्या दाबात झालेला बदल, आर्द्रता याबाबत माहिती समजते. त्यामुळे घटना घडण्यापूर्वी ते सुरक्षित ठिकाणी जातात. 2004 मध्ये भारताच्या कुड्डालोर किनाऱ्यावर त्सुनामी आली होती, यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यावेळी अनेक म्हशी, शेळ्या आणि श्वान सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते. त्यामुळे प्राण्यांनी दिलेली चेतावणीकडे दुर्लक्ष करू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -