हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून आई आणि मुलाच्या नात्याला कलंकित करणारा एक प्रकार समोर आला आहे. एका मुलगा त्याच्या ४० वर्षीय सावत्र आईसोबत पळून गेला.यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केले. हे प्रकरण समोर येताच गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली.
हतबल पित्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.
मुलाच्या पित्याने सांगितले की त्याची पहिली पत्नी मरण पावली होती, त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. गेल्या १५ वर्षांपासून पत्नीसोबत राहत होता. तो काही महिन्यांपूर्वी पहिल्या पत्नीपासूनच्या मुलाला आपल्याकडे घेऊन आला होता. मुलगा सावत्र आईला त्याची आई म्हणत असे आणि तिच्या पाया पडत असे. पण दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे कोणालाही माहिती नव्हते. काही दिवसांपूर्वी दोघेही अचानक पळून गेले.
याशिवाय, पीडित पित्याने सांगितले की जेव्हा तो पोलिसांकडे पोहोचला तेव्हा त्याला कळले की दोघांनीही कोर्ट मॅरेज केले आहे. परंतु पीडिताचे म्हणणे आहे की त्याचा मुलगा १७ वर्षांचा अल्पवयीन आहे, म्हणून हे लग्न बेकायदेशीर आहे. पण पोलिसांचे म्हणणे आहे की मुलाने न्यायालयात प्रौढ असल्याचा पुरावा दिला आहे, ज्याची चौकशी सुरू आहे.
पीडित पित्याने असेही सांगितले की त्याच्या पत्नीने जाण्यापूर्वी ३० हजार रुपये रोख, चांदीचे जोडवी, सोन्याचे कानातले, हातातील अंगठ्या आणि चांदीचे ब्रेसलेट हिसकावून घेतले. आता या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.