Airtel 189 Rupees Recharge Plan । भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांसाठी १८९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ज्या ग्राहकांना आपलं सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवायचं आहे, परंतु जास्तीचे इंटरनेट वापरण्याची गरज लागत नाही अशा यूजर्स साठी एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय ठरेल. हा प्लॅन आता संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये काय काय फायदे मिळतात ते आपण सविस्तर जाणून घेऊयात …
21 दिवसांची वैधता – Airtel 189 Rupees Recharge Plan
एअरटेलचाय या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (Airtel 189 Rupees Recharge Plan) ग्राहकांना २१ दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. या कालावधीत यूजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि १ GB इंटरनेटचा लाभ घेता येतोय.. हे इंटरनेट दररोज १ GB नव्हे तर संपूर्ण २१ दिवसांसाठी १ GB इंटरनेट असेल. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आला आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात डेटाची आवश्यकता लागत नाही, परंतु तरीही अमर्यादित व्हॉइस कॉलचा लाभ ते घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक, सामान्य फोन वापरकर्ते किंवा कमीत कमी इंटरनेटची गरज असलेल्या ग्राहकांसाठी हा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय ठरेल.
२०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे एअरटेलचे २ च रिचार्ज प्लॅन आहेत. एक म्हणजे हा १८९ चा रिचार्ज प्लॅन (Airtel 189 Rupees Recharge Plan) आणि दुसरा आहे तो म्हणजे १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… या दोन्ही प्लॅन ची तुलना करायची झाल्यास, १९९ च्या रिचार्ज मध्येही हेच सर्व बेनेफिट्स मिळतात हे १८९ मध्ये आहेत, परंतु १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा २८ दिवसाच्या वैधतेसह येतो.. त्यामुळे ग्राहकांना जास्त कालावधीसाठी हा रिचार्ज वापरता येतो. त्यामुळे तुम्ही १० रुपये जास्त खर्च करून १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन सुद्धा मारू शकता .
दरम्यान, एअरटेलने OTT सेवांसह कंटेंट-रिच प्लॅनसह आपला प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओ वाढवण्यावर भर दिला आहे. अलीकडेच, कंपनीने २७९ रुपयांपासून सुरू होणारे नवीन प्लॅन सादर केले होते. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना नेटफ्लिक्स, झी५ आणि जिओहॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सहज ऍक्सेस मिळतो. हा प्लॅन डेटा आणि व्हॉइस बेनिफिट्ससह मनोरंजन हवे असलेल्या वापरकर्त्यांसाठी खास लाँच करण्यात आला आहे.