Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीइंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील समस्यांबाबत सोमवारी मुंबईत बैठक

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील समस्यांबाबत सोमवारी मुंबईत बैठक

गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी आधारवड असलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील (आयजीजीएच) दीर्घकालीन समस्या, अपुरा कर्मचारी वर्ग, आवश्यक सुविधा व

रुग्णसेवेतील अडचणी आदी विविध विषयांवर ठोस

| निर्णय करण्यासाठी राज्याचे | सार्वजनिक आरोग्य मंत्री | प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १४ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई मंत्रालयात

बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.

आम. राहुल आवाडे यांनी, इचलकरंजी रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा, आवश्यक वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी याशिवाय तांत्रिक अडचणी या संदर्भात शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे या बैठकीत रुग्णालयातील समस्या सुटण्या संदर्भात महत्वाचे निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले. या बैठकीसाठी आमदार राहुल आवाडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य सेवा मुंबई आयुक्त, सहसंचालक रुग्णालये, अर्थ व प्रशासन, अधीक्षक अभियंता, राज्य आरोग्य अधिकारी मुंबई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -