बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी एकास अटक केली आहे. विलास रतनसिंग रजपुत (वय ७५ रा.शांतीनगर) असे त्याचे नांव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व ३६८ ग्रॅमचा गांजा असा ७ हजार ६९८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई अमर शिरढोणे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शांतीनगर परिसरातील गणेश मंदिरनजीक राहणारा विलास रजपुत याच्याकडे गांजा असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीवरून पोलिसांनी विलास रजपुत याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एका प्लास्टीकच्या पिशवीत हिरवट व तपकिरी रंगाचा सुकलेला
गांजा आणि छोटे दोन प्लास्टीक
पुडीत मिळून ३६८ ग्रॅम वजनाचा
गांजा मिळून आला. त्याची किंमत
७३६० रूपये इतकी आहे.
त्याचबरोबर ११९० रुपयांची रोकड व अन्य साहित्य असा ७ हजार ६९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई वाघमारे करत आहेत.