अमेझॉनने प्राइम डे सेल सुरू होण्यापूर्वी आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट देण्याची घोषणा जाहीर केली आहे. कंपनीने ग्राहकांसाठी रिवॉर्ड्स गोल्ड कॅशबॅक (Rewards Gold Cashback) प्रोग्राम सुरू केला आहे. अमेझॉन सेल 12 जुलैपासून सुरू होणार आहे आणि हा सेल तीन दिवसांसाठी लाईव्ह असेल. तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट्सवर सवलतीचा फायदा मिळणार आहे. पण आता ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर 5% कॅशबॅक मिळण्याचा हा प्रोग्राम देखील आवडेल. कंपनीच्या या नवीन प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला प्रत्येक खरेदीवर ५% कॅशबॅक दिला जाईल.
कॅशबॅकसाठी तुम्हाला या गोष्टीशी…
जेव्हा तुम्ही अमेझॉन वरील प्राइम डे सेलद्वारे खरेदीकेल्यानंतर Amazon Pay द्वारे बिल भराल तेव्हाच तुम्हाला कॅशबॅकचा फायदा मिळेल. तुम्ही प्राइम मेंबर असाल किंवा नसाल, या गोल्ड प्रोग्रामचा फायदा सर्वांना मिळेल. फरक फक्त कॅशबॅकमध्ये दिसेल, जसे की जर तुम्ही प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल परंतु जर तुम्ही प्राइम मेंबर नसाल तर या प्रकरणात तुम्हाला शॉपिंगवर 3 टक्के कॅशबॅकचा फायदा दिला जाईल.
या फायद्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तीन महिन्यांत 25 व्यवहार पूर्ण करावे लागतील, Amazon Pay द्वारे 25 व्यवहारांमध्ये UPI पेमेंट, QR कोड स्कॅनद्वारे पेमेंट, पैसे पाठवणे, बिल भरणे किंवा खरेदी करणे यांचा समावेश आहे. 25 व्यवहार पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर 5 टक्के कॅशबॅक मिळण्यास सुरुवात होईल. इतकेच नाही तर, Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड धारक वापरकर्त्यांना Rewards Gold प्रोग्राममध्ये अतिरिक्त फायद्यांचा लाभ मिळेल असे कंपनीने सांगितले आहे.
प्राइम डे 2025 सेल ऑफर्स
उद्यापासून म्हणजेच 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या Amazon सेलसाठी, Amazon ने ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाशी हातमिळवणी केली आहे, याचा अर्थ असा की जर तुम्ही खरेदी करताना यापैकी कोणत्याही बँक कार्डद्वारे बिल भरले तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त बचत करण्याची उत्तम संधी मिळेल.