Saturday, July 12, 2025
Homeब्रेकिंगप्रेम केलं म्हणून दिली भयंकर शिक्षा, दोघांनाही बैल बनवलं अन्..,हादरवून टाकणारा व्हिडीओ!

प्रेम केलं म्हणून दिली भयंकर शिक्षा, दोघांनाही बैल बनवलं अन्..,हादरवून टाकणारा व्हिडीओ!

प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. कधीकधी दोन प्रेमी युगुलांचे आनंदात लग्न लावून दिले जाते. मात्र याच प्रेमाचा कधीकधी भयानक शेवट होतो. सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुण-तरुणीने एकमेकांवर प्रेम केल्यामुळं या दोघांना भयंकर शिक्षा देण्यात आली आहे. त्यांना चक्क बैलन बनवण्यात आलंय.

 

चक्क बैल बनवून नांगराला जुंपलं

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा धक्कादायक प्रकार ओडिशा राज्यातील आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ओडीशा राज्यातील रायगढा जिल्ह्यातील कंजामझीरा गावात प्रेमी युगुलासोबत अमाणुष कृत्य करण्यात आलं आहे. दोघांनही एकमेकांवर प्रेम केलं म्हणून त्यांना चक्क बैल बनवून नांगराला जुंपण्यात आलं. एवढ्यावरच तेथील लोकांचे मन भरले नाही. तर त्यांनी या प्रेमी युगुलांना मंदिरात नेऊन त्यांचे शुद्धीकरण केले आहे.

 

म्हणून प्रेमी युगुलाला दिली शिक्षा

या दोघांनीही तेथील सामाजिक परंपरांच्या विरोधात लग्न केलं होतं. प्रेम करणारा तरुण आणि तरुणी एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे दोघेही अगोदरच एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर प्रेम झाल्यानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केलं. शिक्षा देण्यात आलेला तरुण हा तरुणीच्या मावशीचा मुलगा आहे. अशा प्रकारे जवळच्या नात्यात लग्न करणे त्या गाावत निषिद्ध मानले जाते. याच कारणामुळे या प्रेमी युगुलाला बैल बनवून त्यांना नांगर ओढायला लावण्यात आला आहे.

 

मारहाण केली, मंदिरात नेऊन शुद्धीकरण

ही शिक्षा ठेववण्यासाठी अगोदर गावात पंचायत बोलावण्यात आली. त्यानंतर ठरल्यानुसार बांबूपासून एक नांगर तयार करण्यात आले. प्रेमात पडलेल्या तरुण आणि तरुणीला एखाद्या बैलाप्रमाणे त्या नागराला जुंपण्यात आले आणि जमीन नांगरून घेण्यात आली. गावातील लोक एवढ्यावरच थांबले नाहीत. या प्रेमी युगुलाला नंतर मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही मंदिरात नेण्यात आलं. तिथे त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं.

 

कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, आता या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सामाजिक संस्था आणि मानवी हक्क कार्यकर्ते यांच्याकडून रोष व्यक्त केला जातोय. या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -