जळगाव (Jalgaon News) शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालय अर्थात आर आर विद्यालयाच्या शाळेच्या मैदानावर नववीच्या विद्यार्थ्यांचा (Student Death) अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कल्पेश हा सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर दुपारच्या सुट्टीत मैदानात विद्यार्थ्यांसोबत खेळत होता. यावेळी खेळत असताना अचानक खाली कोसळला. यानंतर कल्पेशला शिक्षकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काही दिवसांपूर्वी कल्पेशचे शाळेतील काही विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मारहाणीत कल्पेशचा मृत्यू झाल्याचा आरोप कल्पेशच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा पालकांनी आणि नातेवाईकांनी घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कल्पेश वाल्मीक इंगळे (वय 15) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कल्पेश हा सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर दुपारच्या सुट्टीत मैदानात विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना अचानक कोसळल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांची मिळाली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच कल्पेशचा मृत्यू झाला होता.