१ जानेवारी पासून कापडावर लावलेला १२ टक्के जीएसटी पुर्ववत ५ टक्के लावून देशातील कापूस उद्योगाला व यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापार प्रकोष्ट च्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सदरचे निवेदन स्विकारून याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन संबंधित नेतेमंडळींनी दिले.