प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने क्विक कॉमर्स क्षेत्रात एंट्री मारली आहे. कंपनीने आता अवघ्या १० मिनिटांची डिलिव्हरी करणारी Amazon Now हि सेवा सुरु केली आहे. सध्या देशाची राजधानी नवी दिल्लीत हि सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी ती बंगळुरू मध्ये सुरु करण्यात आली होती. लवकरच या सेवेचा अन्य शहरातही विस्तार होईल. अमेझॉनच्या या निर्णयाचा फटका Zepto, Blinkit आणि Instamart सारख्या कंपन्यांना बसेल असं बोललं जात आहे. या सर्व कंपन्या किराणा सामान, फळे, भाज्या, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सौंदर्य उत्पादने इत्यादी वस्तू १० ते १५ मिनिटांत पोहोचवण्याचा दावा करतात.
इन्स्टंट डिलिव्हरी मार्केटमध्ये दबदबा वाढणार – Amazon Now
Amazon Now चे उद्दिष्ट ग्राहकांना फक्त १० मिनिटांत दररोजच्या गरजेच्या वस्तू थेट त्यांच्या घरात पोहोचवणे आहे. यामध्ये किराणा, नाश्ता, मांस, वैयक्तिक काळजी उत्पादने आणि ताजी फळे आणि भाज्या यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत Amazon त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांचे सामान डिलिव्हर करत होते, परंतु आता ते १० मिनिटांत डिलिव्हरी देऊन शहरी ग्राहकांच्या वेगाने बदलणाऱ्या गरजा पूर्ण करू इच्छिते. ही सेवा जलद डिलिव्हरीसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या स्थानिक डिलिव्हरी हब आणि मायक्रो-हाऊसिंग सिस्टमवर आधारित आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून कंपनी वेगाने वाढणाऱ्या इन्स्टंट डिलिव्हरी मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करेल.
याबाबत अमेझॉनने म्हटले आहे की बेंगळुरूमध्ये मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे कंपनीला खूप सकारात्मक संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच आता बंगळुरू पाठोपाठ देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये Amazon Now सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा इतर शहरांमध्येही सुरू केली जाईल. Amazon Now च्या एंट्री मुळे Quick Commerce मार्केट मध्ये स्पर्धा आणखी वाढली आहे.
गेल्या महिन्यात, Amazon ने भारतात त्यांची डिलिव्हरी सेवा आणखी चांगली करण्यासाठी २,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या गुंतवणुकीद्वारे, कंपनी आता मोठ्या प्रमाणात डार्क स्टोअर्स उघडणार आहे. हे डार्क स्टोअर्स लहान गोदामांसारखे आहेत, जे शहरांच्या अंतर्गत भागात बांधले जातात ज्यामुळे डिलिव्हरी जलद पद्धतीने करता येते.