सामना सुरु असताना भारताचा कर्णधार इंग्लंडच्या फलंदाजावर भडकल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिल यावेळी एवढा भडकला होता की, तो इंग्लंडच्या खेळाडूवर चाल करून केला आणि त्याने इंग्लंडच्या खेळाडूला दोन शब्ददेखील सुनावले.
मैदानात जोरदार राडा सुरु झाला होता. मैदानात नेमकं काय घडलं, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे आणि तो जोरदार व्हायरल झाला आहे.
ही गोष्ट घडली जेव्हा भारताचा संघ हा मैदानात दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी जसप्रीत बुमराह हा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. बुमरा एवढा अचूक मारा करत होता की, इंग्लंडच्या खेळाडूंना त्याचे चेंडू खेळता येत नव्हते आणि ते वेळ खाऊपणा करत होता. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर खेळताना काही वेळ थांबत होते, हे पाहून शुभमन गिल चांगाच भडकला होता.
बुमराह जेव्हा गोलंदाजी करत होता, तेव्हा शुभमन गिल हा स्लीपमध्ये उभा होता. गिलचा पारा त्यावेळी चढला आणि त्यानंतर तो तिथून पुढे आला. गिलने पुढे आल्यावर इंग्लंडच्या दोन्ही खेळाडूंना चांगलेच सुनावले. इंग्लंडचे खेळाडू त्याचे बोलणे ऐकत होते. पण गिल एवढ्यावर थांबला नाही. जेव्हा झॅक क्राऊलीने आपल्या हाताला लागल्यावर डॉक्टरांना मैदानात बोलावले तेव्हा गिल हा इंग्लंडच्या फलंदाजांच्या जवळ गेला. त्यावेळी गिलने जोरदार राडा घातल्याचे पाहायला मिळाले. यावेळी लोकेश राहुल गिलच्या बाजूला होता. तो नेमकं काय चाललं आहे, हे पाहत होता. त्यानंतर पंचदेखील आले आणि त्यांनी ही गोष्ट थांबवली, नाही तर गिलचा पारा यावेळी चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. गिल यावेळी काही उलट सुलट तर करुन बसणार नाही ना, याची चिंता चाहत्यांना होती. कारण गिल त्यावेळी रागाच्या भरात तिथे गेला होता. पण पंच यामध्ये आले आणि गिल बाजूला झाला.
गिल यावेळी इंग्लंडच्या दोनंही खेळाडूंवर चांगलाच भडकला होता. कारण यावेळी इंग्लंडचे खेळाडू खेळताना टाइम पास करत होते, हे गिलला आवडले नाही आणि त्यामुळेच तो भडकला होता.