बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगल्याप्रकरणी महिलेवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता धोंडीराम वरुडे असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल मनीषा माळी यांनी फिर्याद दिली
आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास दातार मळा गल्ली नं. ३ येथे एका झाडाखाली उघडयावर सुनिता वरुडे ही महिला हातभट्टीची दारु जवळ बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १८०० रुपये किंमतीची १८ लिटर गावठी दारु, ४२० रुपयाच्या ९० मिलीच्या १२ बाटल्या असा २२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.