एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने दुसरे कार्ड देऊन ४८ हजार रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी दत्तात्रय प्रभाकर कुलकर्णी (वय ५८ रा. यड्राव रोड टाकवडे) यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली आहे.
अधिक माहिती अशी, दत्तात्रय कुलकर्णी येईल हे शुक्रवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पैसे काढून देतो असे सांगत त्यांचे एटीएम घेऊन पिन नंबर विचारला. पैसे काढून दिल्यानंतर हातचलाखीने त्या व्यक्तीने कार्डची अदलाबदली केली.
सौदागर भाविक के या नावाचे कार्ड त्याने दिले. त्यानंतर चोरट्याने इचलकरंजी, कबनूर आणि कोल्हापूर येथून विविध एटीएममधून ४७ हजार ४४७ रुपये काढले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच कुलकर्णी यांनी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.