शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. काही असे शेअर आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात मोठे चढ उतार पहायला मिळाले आहेत, यामुळे अनेकांना फटका बसला आहे. मात्र आज आपण अशा एका शेअरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने एका वर्षापेक्षा कमी काळात गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.
गुंतवणूकदारांना मालामाल बनवणाऱ्या शेअरचे नाव स्वदेशी इंडस्ट्रीज अँड लीजिंग लिमिटेड असे आहे. या शेअरने गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. जर तुम्हा यात एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत आता 11 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.
हे सुद्धा वाचा
करिश्मा कपूर प्रेमात ठरली कमनशिबी, 5 सेलिब्रिटींसोबत ब्रेकअप, तर नवऱ्याने पहिल्याच रात्री लावली बोली
2 आठवडे दररोज आले खाल्ले तर काय होईल? आहेत खूपच आश्चर्यकारक फायदे
मुस्लिम असल्यामुळे GF ने तोडलं 5 वर्षांचं नातं, केलं दुसऱ्या मुलाशी लग्न… गायकने व्यक्त केले दु:ख
गेल्या सहा महिन्यांपासून सतत अप्पर सर्किट
स्वदेशी इंडस्ट्रीज अँड लीजिंग लिमिटेड या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून सतत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली. आता या शेअरची किंमत 27.93 रुपयांवर पोहोचली आहे जी 52 आठवड्यांतील सर्वात जास्त किंमत आहे.
सहा महिन्यांत गुंतवणूकदार मालामाल
तुम्ही 6 महिन्यांपूर्वी स्वदेशी इंडस्ट्रीज अँड लीजिंग लिमिटेड या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला आज 9.5 लाख रुपये मिळाले असते. याचात अर्थ तुम्हाला 850 % पेक्षा जास्त परतावा मिळाला असता.
एका वर्षात एका लाखाचे 11 लाख
स्वदेशी इंडस्ट्रीज अँड लीजिंग लिमिटेड या शेअरने एका वर्षापूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर 1050 % परतावा दिला आहे. म्हणजे वर्षभरापूर्वी यात तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आता 11.5 लाख रुपये झाले असते. म्हणजेच तुम्हाला 12 महिन्यांमध्ये 10.5 लाख रुपयांचा नफा झाला असता.
5 वर्षांत करोडपती
तुम्ही या शेअरमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्ही जवळपास करोडपती बनला असता. तेव्हा या शेअरची किंमत फक्त 29 पैसे होती. त्यावेळी गुंतवलेले एक लाख आता 96 लाख रुपये बनले असते.
ही कंपनी काय काम करते?
स्वदेशी इंडस्ट्रीज अँड लीजिंग लिमिटेड कापड आणि व्यापार व्यवसायात काम करते. ही कंपनी बीएसईवर लिस्टेड आहे.या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 9.76 कोटी रुपये आहे.