Thursday, August 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: केलेल्या मिळकतीचे कुलूप तोडल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा

इचलकरंजी: केलेल्या मिळकतीचे कुलूप तोडल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा

फायनान्स कंपनीने कर्जापोटी सील केलेल्या मिळकतीत बेकायदेशीररित्या प्रवेश करून कुलूप तोडल्याप्रकरणी एका महिलेसह ७ गाळेधारकांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एडलवाईस एआरसी पुणेच्या

प्रविण पांडुरंग देसाई (रा. फुलेवाडी- कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, रजिया बेगम नईमहम्द मुल्ला (रा. जवाहरनगर) यांनी कबनूर येथील गट नंबर १४६ / ९ येथील मिळकत नंबर १४३४/१ या मिळकतीवर खाजगी फायनान्स कंपनीतून कर्ज घेतले

होते.

थकीत कर्जापोटी कंपनीने सदरची मिळकत सील केली होती. परंतु ३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास रजिया बेगम मुल्ला व अन्य सहा गाळेधारकांनी बेकायदेशीरपणे प्रवेश करत कुलूप तोडले. तसेच आम्ही येथेच राहणार, तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -