Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रआयशरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थिनी ठार

आयशरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थिनी ठार

वडाळा रोडवर मंगळवारी (दि.१५) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार शाळकरी मुलगी जागीच ठार झाली. ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने, तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

संतप्त जमावाने ट्रक चालकास चोप देऊन पोलिसांच्या स्वाधिन केले.

 

सोहना मिनाझ शेख (१५, रा. ट्यूलीप टॉवर, वडाळा रोड) असे मृत मुलीचे नाव असून, क्लासमधून दुचाकीने घरी जात असताना हा अपघात झाला. आयशर ट्रक (एमएच १५, जेके ७०११) अत्यंत भरधाव वेगाने जात होता. तर दुचाकीने जाणाऱ्या सोहना शेख हिच्या दुचाकीला (एमएच १५, डीझेड ८६२५) ट्रकने जोराची धडक दिली. या घटनेत सोहना ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने, तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रकचालक संशयित योगेश जाधव याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने त्याला पकडून चोप दिला. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने, इंदिरानर, वडाळा गावाकडून शहराच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जमावाने पोलिसांसमोर संतप्त भावना व्यक्त केला.

 

या भरधाव आयशरने मोपेडला ठाेस दिली.

पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकास ताब्यात घेऊन, मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच अपघातग्रस्त आयशर ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी टाहो फोडला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आयशरने ठाेस दिल्याने मोपेडवरुन विद्यार्थीनी खाली पडली होती.

वेगाला मर्यादा नाहीच

 

इंदिरानगर, वडाळा गावाकडून शहरात येणारी वाहतूक तसेच वडाळा गावाकडून नाशिकरोडला कनेक्ट होणाऱ्या वाहतुकीला अजिबातच मर्यादा नसल्याचा आरोप संतप्त जमावाने केला. या मार्गावर महाविद्यालये, कोचिंग क्लासेस तसेच मोठी रुग्णालये आहेत. अशात वाहनांचा वेग मर्यादीत असणे आवश्यक आहे. मात्र, अशातही वाहनचालक वेगमर्यादा पाळत नसल्याने, या भागात छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. वाहतूक पोलिस या मार्गावर कधीही दिसून येत नसल्याने, वाहनचालकांवर विशेषत: ट्रक चालकांवर नियंत्रणच नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

 

रुग्णालयात मोठी गर्दी

 

मुलीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असता, नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात रुग्णालयात गर्दी केली होती. तसेच मुंबई नाका पोलिस ठाण्यातही ट्रकचालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यासाठी गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत गर्दी असल्याने, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -