चंदर आभार फाटा येथील लक्ष्मी मंदिरजवळ हल्लेखोरांनी केलेल्या तलवार हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात वैभव अनिल पुजारी (वय २३, रा. चंदूर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेमविवाहाच्या कारणावरून सदरचा हल्ला झाला आहे. जखमी वैभव पुजारी याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा
पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, वैभव पुजारी याने महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला आहे. याचा राग बंडा शिंदे यांना होता. त्यांनी दिलेल्या चिथावणीवरून मयूर आकाराम पुजारी (रा. चंदूर), + ओंकार बिरु पुजारी (रा. तिळवणी), शुभम बोरसे (रा. उदगाव) आणि राहुल श्रीकांत कांबळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी तलवार घेऊन वैभव पुजारी याचा पाठलाग केला.