Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रवाढदिवस नेत्याचा, बळी मात्र कामगाराचा! शुभेच्छा फलक लावताना विजेचा धक्का लागून एकाचा...

वाढदिवस नेत्याचा, बळी मात्र कामगाराचा! शुभेच्छा फलक लावताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

राजकीय नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरने एकाचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना सिंदेवाही शहरात घडली आहे. आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावत असताना विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन लागलेल्या विद्युत झटक्यामुळे एका नोकराचा मृत्यू झाला.

 

तर दोन जण जखमी झाले आहेत. किशोर पाटील असे मृताचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

 

ही घटना दिनांक १८ जुलै रोजी रात्री सुमारे आठ वाजता सिंदेवाही शहरातील सुचक यांच्या इमारतीत घडली. घटनास्थळी किशोर प्रेमदास पाटील (वय ३५) जो की येथील एका मिल मालकाचा दिवानजी होता, तो आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसह आमदार भांगडीया यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लावत होता. त्याच वेळी बॅनर जवळच असलेल्या जीवंत विद्युत वाहिनीला चिकटल्याने त्याला जोरदार विद्युत धक्का बसला.

 

या धक्क्याने किशोर पाटील व जितेंद्र कुमार हे दोघे खाली कोसळले, तर इंद्रजीत सोनवणे यांनी परिस्थिती पाहून तातडीने फलक सोडून दिला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांची प्रकृती तपासली. यात जितेंद्र कुमार यांना थोडा प्रतिसाद मिळाला, मात्र किशोर पाटील यांची प्रकृती गंभीर होती. लगेचच सर्वांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, किशोर पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

घटनेनंतर इंद्रजीत सोनवणे यांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने वाढदिवसाचे औचित्यच काळवंडले असून शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -