Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रझोमॅटोने जगाला दाखवली ताकद, दोन दिवसात केली 52 हजार कोटींची कमाई

झोमॅटोने जगाला दाखवली ताकद, दोन दिवसात केली 52 हजार कोटींची कमाई

देशात सर्वात मोठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोची परेंट कंपनी इटरनल ( Eternal ) शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून धुमाकुळ घालत आहे. खास बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात कंपनी शेअरमध्ये २१ टक्के वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये ५२ हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या तिमाहीचे निकालामुळे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आश्चर्य म्हणजे ओव्हरऑल शेअर बाजारात दबावाचे वातावरण असताना हे घडले आहे. झोमॅटोची पॅरंट कंपनीच्या इटरनल शेअरमध्ये कशी वाढ झाली ते पाहूयात…

 

मंगळवारी 15 टक्के वाढ

मंगळवारी शेअरबाजारात झोमॅटोची पेरेंट कंपनी इटरनलचे शेअरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. बीएसईच्या आकड्यांनुसार कंपनीचे शेअर उसळी मारत २९२ रुपयांवर खुले झाले. पाहाता पाहाता ३११.६० रुपयांसह दिवसाच्या उच्च पातळीवर पोहचले.खास बाब म्हणजे हा कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यातील सर्वाधिक भाव आहे. दुपारी २.२० वाजल्यावर कंपनीचा शेअर ११.३० टक्के वेगासह ३०१.८५ रुपयांवर कामकाज करीत होता. तसे पाहिले तर कंपनीचा शेअर कामकाजा दरम्यान २८९.९५ रुपयांच्या दिवसाच्या लोव्हर पातळीवरही गेला होता. एक दिवसांपूर्वी कंपनीचा शेअर २७१.२० रुपयांवर बंद झाला होता.

 

दोन दिवसांत २१ टक्क्यांपर्यंत वाढ

विशेष बाब म्हणजे कंपनीच्या शेअरमध्ये दोन दिवसांत २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी इटरनलचा शेअर २५७.३५ रुपयांवर बंद झाला. तेव्हापासून कंपनीच्या शेअरमध्ये ५४.२५ रुपयांची वाढ दिसून आली आहे. सोमवारीही कंपनीच्या शेअरमध्ये ५.३८ टक्क्यांनी वाढ दिसून आली. मंगळवारीही कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांनी वाढ दिसून आली. अशाप्रकारे, दोन दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २१ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. तसे, चालू वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. तर एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये ३६ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ६ महिन्यांत कंपनीने गुंतवणूकदारांना ३९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

 

दोन दिवसात 52 हजार कोटींची कमाई

या तेजीनंतर कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये खूपच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीएसईच्या आकड्यांनुसार शुक्रवारी जेव्हा शेअरबाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे व्हॅल्युएशन २,४८,१४८.७० कोटी रुपये झाले होते. जे मंगळवारी वाढून ३,००,४५७.८४ कोटी रुपयांवर पोहचले आहे. अशा प्रकारे कंपनीच्या मार्केटमध्ये ५२,३१०.१४ कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. जर एकट्या मंगळवारचा विचार करता कंपनीची व्हॅल्युएशनमध्ये कामकाजाच्या सत्रा दरम्यान ३८,९५५.३९ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे.

 

कंपनीचे शेअर्स का वाढले

इटरनलच्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटने निव्वळ ऑर्डर मूल्यात वर्षानुवर्षे १२७ टक्के वाढ नोंदवली आहे, जी ९,२०३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे ब्लिंकिटने कंपनीच्या पारंपारिक अन्न वितरण व्यवसाय ग्रोकला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुवामाच्या अहवालानुसार, ब्लिंकिट “ग्रोथच्या बाबतीत खूपच चांगली दिसत आहे. तर जेफरीजने चांगले मार्जिन आणि स्पर्धात्मक दबावांशी संबंधित चिंता कमी केल्या आहेत. जेफरीजने म्हटले आहे की बिगबास्केट, फ्लिपकार्ट, स्विगी आणि अमेझॉनसह इतर स्पर्धकांना ब्लिंकिटसाठी “स्पर्धात्मक धोका जास्त असल्याचा दावा केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -