Wednesday, July 23, 2025
Homeइचलकरंजीबेनाडे खून प्रकरणी आणखी तिघांना अटक

बेनाडे खून प्रकरणी आणखी तिघांना अटक

रांगोळी (ता. हातकणंगले) येथील लखन अण्णाप्पा बेनाडे (वय ३२) याच्या खुनासाठी शस्त्रे पुरवणारे आणि जागा दाखवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. सिकंदर सुलेमान मुल्ला (वय२२, रा. दुंडगे रोड, गडहिंग्लज) आणि आशिष अरुण शिंत्रे (वय २१, रा. पेद्रेवाडी, ता. आजरा), युवराज ऊर्फ यशवंत अरुण संकपाळ (वय २०, रा. कडगाव रोड, गडहिंग्लज) अशी अटकेतील तिघांची नावे

आहेत. या तिघांना मंगळवारी

[(ता. २२) न्यायालयात हजर

केले. त्यांची २९ जुलैपर्यंत

पोलिस कोठडीत रवानगी झाली.

पत्नीला त्रास देव असल्याच्या रागातून विशाल पस्ते आणि त्याच्या साथीदारांनी लखन बेनाडे याचे अपहरण

करून खून केला होता. या गुन्ह्यात एका महिलेसह पाच जणांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. १८) अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी काही संशयितांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी गडहिंग्लजमधील दोघे आणि पेद्रेवाडी येथील एका युवकास त्यांच्या घरातून अटक केली. या तिघांनी मारेकऱ्यांना शस्त्रे पुरवली, तसेच बेनाडे याच्या खुनासाठी जागा दाखवल्याची माहिती चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांसह आणखी काही संशयितांचा सहभाग खुनाच्या घटनेत आहे. याची खात्री करण्याचे काम सुरू आहे. त्यांचा सहभाग स्पष्ट होताच अटकेची कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -