मॉकड्रील अंतर्गत पोलीस विभागातर्फे प्रात्यक्षिक करताना पोलीस कर्मचारी तसेच तैनात केलेला फौजफाटा नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या फॉर्म्युन प्लाझा याठिकाणी अचानकपणे पोलीस, + अग्रिशमन दल, रुग्णवाहिका, श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकही दाखल झाल्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अन् ? संशयास्पद वस्तु अथवा व्यक्ती आढळून आल्यास काय दक्षता घ्यावयाची याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे समजल्यानंतर सर्वच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
सांगली रोडवरील फॉर्च्यून प्लाझामध्ये दोन संशयास्पद बॅगा आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच तातडीने गावभाग
पोलिस ठाण्याचे पथक तेथे दाखल झाले. फॉर्च्यून प्लाझा येथे उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांना प्रथमतः सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. त्यानंतर प्रत्येक नागरिकांकडे विचारपूस करुन माहिती घेण्यात येऊ लागली. पोलीस उपाधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या सुचनेनुसार घटनास्थळी तातडीने अग्रिशमन दल आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले होते. त्याचदरम्यान फॉर्च्यून प्लाझामध्ये बॉम्ब सापडल्याची चर्चा शहरात बघता बघता पसरल्याने अनेकजण त्याठिकाणी येऊ लागले. परिणामी इचलकरंजी-सांगली रोडवरील वाहतुक ठप्प झाली. त्याच अडचणीतूनच मार्ग काढत श्वानपथक आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. नेमके काय घडले आहे याची कोणालाच माहिती नसल्याने तर्कवितर्क आणि
चर्चेला उधाण आले होते.
प्राप्त माहितीनुसार बॉम्ब शोध पथकाने त्याठिकाणी सापडलेल्या दोन संशयास्पद बंगा सुरक्षितपणे खाली आणल्या आणि निर्जनस्थळी नेत त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. या सर्व घटनाक्रमात सुमारे दीड तासाचा कालावधी गेला. अखेर अप्पर पोलीस अधिक्षक आण्णासाहेब जाधव, उपाधिक्षक समीरसिंह साळवे यांनी जर कोठेही एखादी संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तु आढळल्यास कशी व कोणती दक्षता घ्यावी? कोणत्या उपाययोजना कराव्यात? याचे प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. आणि वस्तुस्थितीची माहिती समजताच उपस्थित सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र शहरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची चर्चा दिवसभर चांगलीच रंगली होती.