Wednesday, July 23, 2025
Homeब्रेकिंगब्लेंडर महाग की रॉयल स्टॅग? तळीरामांनो हे वाचा मग ठरवा बारमध्ये जायचं...

ब्लेंडर महाग की रॉयल स्टॅग? तळीरामांनो हे वाचा मग ठरवा बारमध्ये जायचं की नाही

दारूच्या किमतीत वाढ झाल्यापासून तळीरामांमध्ये कही खुशी, कही गमचे वातावरण बघायला मिळत आहे. प्रीमियम व्हिस्की ब्लेंडर प्राईडच्या एक लिटर बॉटलच्या किमतीत अवघी 100 रुपये वाढ झाली तर सर्वाधिक पसंती असलेल्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या एक लिटर बॉटलची किंमत तब्बल 350 रुपयाने वाढली आहे.

 

वाईन शॉपमधील जुना स्टॉक संपत आल्यामुळे आता वाढीव दराचा स्टॉक दाखल होत असल्याने जादा पैसे मोजावे लागत आहेत. मुंबईसह राज्यात रॉयल स्टॅग व्हिस्कीला सर्वाधिक तळीरामांची पसंती आहे. त्यानंतर ओक्सस्मिथ सिल्वरलाही अनेकांची पसंती दिसून येते. नेमकी याच व्हिस्कीमध्ये मोठी दरवाढ झाल्याचे दिसते.

 

रॉयल स्टॅग व्हिस्कीची एक लिटर बॉटल 1 हजार 50 रुपयाला मिळत होती. ती आता 1 हजार 400 रुपये झाली आहे. ओक्सस्मिथ सिल्वर 935 रुपयाला मिळत होती ती थेट 1 हजार 370 रुपये झाली आहे. मॅकडॉल व्हिस्कीची किंमतही 640 रुपयावरून 900 रुपयापर्यंत पोहचली आहे. त्या तुलनेत ब्लेंडर्स प्राईडची एक लिटर बॉटलची किंमत 1 हजार 900 रुपये होती. ती 2 हजार रुपये झाली आहे. ओक्सस्मिथ गोल्ड 1 हजार 450 रुपयाला मिळत होती ती आता 1 हजार 600 रुपयाला घ्यावी लागणार आहे.

 

रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या किमतीमध्ये झालेली मोठी वाढ लक्षात घेता, आता रॉयल स्टॅग पिणार्‍यांना बारमध्ये जाणे परवडणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -