नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 28 वर्षीय विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मालेगावातील सौंदाणे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केली आहे.
हर्षाली राहुल अहिरे ( वय – 28 ) संकेत अहिरे ( वय -5 ) व आरोही अहिरे ( वय – 7 ) अशी मृतांची नावे आहेत. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू, सासरा, नणंद या चौघांविरोधात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत विवाहितेचा पती, सासरा पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सासरच्या छळाला कंटाळूनच हर्षाली राहुल अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासरा यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.