Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रबिग बॉस 19 मध्ये ५ मोठे बदल, सलमान खानसह नवीन ट्विस्ट

बिग बॉस 19 मध्ये ५ मोठे बदल, सलमान खानसह नवीन ट्विस्ट

बिग बॉस 19 मध्ये ५ मोठे बअभिनेता सलमान खानचा चर्चित शो ‘बिग बॉस 19’(Bigg Boss) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यंदाचा हा सीझन आधीच्या कोणत्याही सीझनपेक्षा वेगळा आणि धक्कादायक ठरणार आहे. कारण यंदा बिग बॉसमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल ५ मोठे बदल करण्यात आले आहेत.

 

बिग बॉस चाहते हैं…’ हा प्रसिद्ध आवाज होणार गायब :

बिग बॉस १९ मध्ये ‘बिग बॉस(Bigg Boss) चाहते हैं…’ हा डायलॉग ऐकायला मिळणार नाही. त्याऐवजी आता ‘बिग बॉस जानता चाहते हैं…’ असं नवीन संवाद असणार आहे. गेल्या अनेक सीझनपासून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला आवाज आणि संवाद बदलण्याचा निर्णय प्रेक्षकांना नक्कीच धक्का देणारा आहे.

 

आता स्पर्धकांना घर चालवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. कोणत्या स्पर्धकाला कोणतं काम करायचं, रेशनचं नियोजन, कामांची विभागणी – हे सर्व स्पर्धक स्वतः ठरवतील. बिग बॉस यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही. यामुळे घरात अधिक गोंधळ, वाद आणि राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

दोन वेगळ्या थीम्स – ‘राजकीय’ आणि ‘रिबाउंड’ :

यंदा बिग बॉस(Bigg Boss) १९ मध्ये दोन थीम असणार आहेत – Political (राजकीय) आणि Rebound (मागे फिरणं). या थीमनुसारच स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. राजकीय विषयांवर चर्चेत असलेले, किंवा पूर्वी चर्चेत आलेले स्पर्धक निवडले जाणार आहेत.

 

यंदा बिग बॉसचं सूत्रसंचालन फक्त सलमान खान नव्हे, तर करण जोहर, फराह खान आणि अनिल कपूरही करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे तीन होस्ट्स वेगवेगळ्या टप्प्यांवर शो होस्ट करणार असल्याचं संकेत आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात नवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -