Saturday, July 26, 2025
Homeक्रीडाभारताच्या अडचणीत वाढ, 2 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, निवड समितीकडून कुणाचा समावेश?

भारताच्या अडचणीत वाढ, 2 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, निवड समितीकडून कुणाचा समावेश?

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघातून ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. तर आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या वेगवान गोलंदाजांना दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्टार स्पिनर श्रेयांका पाटील आणि लेग स्पिनर प्रिया मिश्रा या दोघींना दुखापतीमुळे वूमन्स इंडिया ए टीममधून बाहेर व्हावं लागलं आहे. या दोघींची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र आता दोघींना दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावं लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

 

श्रेयांका पाटील आणि प्रिया मिश्रा या दोघींची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र या दोघींचा ऑस्ट्रेलिया दौरा फिटनेसवर आधारित होता. त्यामुळे या फिट झाल्या तरच त्यांना जाता येणार होतं. मात्र आता या दोघींनी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. सध्या या दोघींवर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

 

कुणाचा समावेश?

बीसीसीआय निवड समितीने यास्तिका भाटीया हीचा एकदिवसीय संघात समावेश केला आहे. तर दोन्ही दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाजांच्या जागी धारा गुज्जर आणि प्रेमा रावत यांना संधी देण्यात आली आहे. आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर यास्तिका भाटीयावर निवड समितीचं लक्ष असणार आहे. यास्तिका नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्याचा भाग होती. मात्र यास्तिकाला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.

 

पाहा सुधारित संघ आणि वेळापत्रक

इंडिया ए वूमन्स टीमचं वेळापत्रक

ऑस्ट्रेलिया ए वूमन्स विरुद्ध इंडिया ए वूमन्स यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 7 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. हा सामना मॅकॉयमध्ये होणार आहे. तर याच मैदानात 9 आणि 10 ऑगस्टला दुसरा आणि तिसरा सामना होईल. त्यानंतर 13 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. दुसरा सामना 15 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामन्याचा थरार 17 ऑगस्टला रंगणार आहे. तर 1 मल्टी डे मॅच 21 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -