रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागाने आपत्कालीन कोटा (EQ) अंतर्गत तिकिटे बुक करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या नव्या नियमामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा लवकर त्यांच्या रिक्वेष्ट पाठवणे बंधनकारक केले आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांनी आता ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या किमान एक दिवस आधी त्यांची विनंती दाखल करावी. रेल्वे मंत्रालयाने अलीकडील निर्णयानुसार हा बदल केला आहे की ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी आरक्षण चार्ट तयार केले जातील.
रेल्वेने नेमकं काय म्हटले ? Indian Railways Rules
आपत्कालीन कोट्याच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधीचे एक परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, “०००० ते १४०० तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या सर्व गाड्यांसाठी आपत्कालीन कोट्याची विनंती प्रवासाच्या आदल्या दिवशी १२०० तासांपर्यंत इमर्जन्सी कोटा EQ सेलवर पोहोचली पाहिजे. तसेच १४०१ ते २३५९ तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या उर्वरित सर्व गाड्यांसाठी आपत्कालीन कोट्याची विनंती प्रवासाच्या आदल्या दिवशी १६०० तासांपर्यंत EQ सेलवर पोहोचली पाहिजे.
खरं तर इमर्जन्सी कोटा (Indian Railways Rules) जागा व्हीआयपी, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असलेल्या प्रवाशांसाठी राखीव आहेत. परंतु, या सुविधेचा गैरवापर आणि शेवटच्या क्षणी केलेल्या विनंत्यांमुळे चार्ट तयार करण्यास उशीर होत आहे. परिणामी वेटिंग लिस्ट मधील तिकीट कन्फर्म करण्यात अडचणी येतात आणि प्रवाशांची गैरसोय होतेय.
यापूर्वी, रेल्वे बोर्डाने ट्रेनचा आरक्षण चार्ट ४ तासांऐवजी ८ तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. दुपारी २ च्या आधी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, चार्ट आदल्या दिवशी रात्री २१:०० वाजता तयार करण्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय, रेल्वेकडून प्रवासी आरक्षण प्रणालीत बदल करण्याची चर्चा देखील झाली होती. रेल्वे मंत्रालयाने सर्व अधिकाऱ्यांना या वेळापत्रकांचे पालन करण्याचे (Indian Railways Rules) आवाहन केले आहे जेणेकरून तिकीट वाटप वेळेत होईल आणि चार्ट तयार होण्यास उशीर होणार नाही. यामुळे गाडी सुटण्यासही उशीर होणार नाही आणि प्रवाशांना अडचणीचा सामनाही करावा लागणार नाही .